करमाळा, प्रतिनिधी – शहरातील फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त आज शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी भक्तिमय वातावरणात आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी दुपारी 1.00 ते सायं. 4.00 या वेळेत विशेष आरती व महाप्रसाद कार्यक्रम पार पडणार असून, करमाळा शहरातील सर्व नागरिक व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ समाज सेवा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

.

.

.

.

.

