March 1, 2026
IMG-20260216-WA0002

करमाळ्यात दोघांवर गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रेम संबंध न ठेवल्यास बदनामीची धमकी देण्याच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना करमाळा तालुक्यात घडली आहे.

याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या पालकाने दि.१३/०१/२६ रोजी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून करमाळा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावामधील एक २४ वर्षीय व एक अल्पवयीन असे दोन आरोपी फिर्यादीची अल्पवयीन मुलगी निर्भया (नाव बदलले आहे) हिला तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते. प्रेमसंबंध न ठेवल्यास तिची बदनामी करण्याची धमकी देवून तिला त्रास देत होते. या दोघा आरोपींच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीची मुलगी निर्भया हिने दि.२१/०१/२०२६ रोजी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मयत निर्भयाच्या पालकांच्या या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ सह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला असून या गुन्ह्यातील २४ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. सहा.पो.नि. गिरीजा मस्के या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *