June 21, 2026
IMG-20260215-WA0008

करमाळा, विशाल परदेशी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातील पंचशिल स्पोर्टस ॲण्ड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहर व तालुक्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रविवार दि. १५ रोजी सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या स्पर्धा साडेनऊ वाजेपर्यंत चालल्या.

या स्पर्धेमध्ये ज्युनिअर, सिनिअर केजी व १ ली गटात १ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत मुलींतून ओवी महेश क्षिरसागर हीने प्रथम, सौफिया समीर शेख हीने द्वितीय, वैष्णवी विशाल शेळके हीने तृतीय क्रमांक पटकावला. याच गटातून मुलांतून विश्वराज विलास अलदर प्रथम, रुद्र गणेश चौधरी द्वितीय तर कार्तिक गणेश माळी हा तृतीय आला. यानंतरच्या दुसरी ते चौथी या गटात २ कि.मी. अंतराच्या शर्यतीत मुलींतून समृद्धी सचिन ढेरे, श्रावणी किरण झिंजाडे आणि विना मल्हारी माने यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आला. याच गटात मुलांमधून समर्थ महेश इरकर, ऋतुराज सोमनाथ खोमणे आणि अर्णव मारुती साखरे यांनी एक ते तीन क्रमांक पटकावले.

५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या ३ कि.मी. धावण्याच्या उच्च प्राथमिक गटात मुलींतून आर्या वैशीराम काळे, अमृता उदय ढेरे, जानवी मल्हारी माने तर मुलांतून श्रेयश दत्तात्रय शिंदे, अमित अमोल डिकोळे, विश्वराज तात्या गवेकर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता आठवी ते दहावी ४ किमी धावण्याच्या स्पर्धेत मुलींतुन विभा विकास आलदर हीचा प्रथम, दुर्गा शंकर जाधव हिचा द्वितीय, सृष्टी रेवणनाथ खैरे हीचा तृतीय तर मुलांमधून अमित जयराम डिकोळे, प्रतीक रवींद्र ढेरे आणि राम धनंजय सरडे यांनी अनुक्रमे एक ते तीन क्रमांक पटकावले.

आयोजकांच्या वतीने प्रत्येक गटात एक ते तीन क्रमांक काढण्याचे नियोजन असले तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून प्रत्येक गटातून उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढण्यात आले असून छोट्या गटातून हिंदवी अभिजीत वायकर, मनवा महेश बोरडे, रेयांश विपुल गांधी, सार्थक सुरज कांबळे यांना तर प्राथमिक गटातून विशुद्धी विभव गांधी, रिद्धी आणि सिद्धी राकेश साळवी आणि मुलांमधून मंथन मंगेश बागडे यांचे उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.

उच्च प्राथमिक गटात मुलींतून स्वागता सचिन मुसळे आणि भारती कमलाकर जाधव तर मुलांमधून आदर्श अमोल डिकोळे आणि रोहित महादेव पोळ यांना उत्तेजनार्थ स्पर्धक ठरविण्यात आले. यासोबतच माध्यमिक गटातून सृष्टी तानाजी ढाणे आणि राधा अण्णासाहेब कानगुडे तसेच मुलांमधून प्रतिक संतोष साळुंखे आणि आदेश हनुमंत पवार हे उत्तेजनार्थ बक्षीसाचे मानकरी ठरले.

या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक विश्वनाथ लोंढे, पाटील सर, हिरालाल पवार, अंकुश थोरात यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचशिल स्पोर्टस ॲण्ड सोशल प्रतिष्ठाणचे देवा लोंढे, रवि ओहोळ, निळकंठ हिंगसे, संतोष कांबळे, कय्युम मुलाणी, गणेश केंडे, सोमनाथ थाटे, सौदागर बनसोडे, प्रमोद हिंगसे, गणेश टकले, अमोल आव्हाड, नागेश ओहोळ, काका जव्हेरी, नागेश आव्हाड, सुनिल कांबळे, जहाँगीर मुलाणी, अफजल मुलाणी, दिनेश जांभळे, सोनु घोडके यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!