करमाळा, प्रतिनिधी – फॅबटेक मल्टीस्टेटच्या करमाळा शाखेने गेल्या २१ महिन्यांत उल्लेखनीय आर्थिक प्रगती साध्य केली आहे. चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत करमाळा शाखेतील कर्मचाऱ्यांनी टीमवर्कच्या बळावर ही यशस्वी भरारी घेतली आहे.
करमाळा शहरात बस स्टँड समोरील बँक ऑफ इंडिया शेजारी केवळ २१ महिन्यांपूर्वी फॅबटेक मल्टीस्टेट करमाळा शाखेची स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेपासून शाखेने चालू महिन्यापर्यंत एकूण रु. ६ कोटी १५ लाख ठेवी जमा केल्या असून रु. २ कोटी ३२ लाखांचे गोल्ड लोन आणि रु. ३ कोटी ६ लाखांची इतर कर्जे वितरित केली आहेत. यामधून शाखेला रु. ३२ लाख १० हजारांचा नफा झाला असून एकूण व्यवसाय रु. ११ कोटी ५३ लाखांपर्यंत पोहोचला आहे.
या यशाबद्दल करमाळा शाखाधिकारी ब्रह्मदेव शिंदे यांनी सर्व ठेवीदार, कर्जदार तसेच शाखेतील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे. पुढील काळातही याच टीमवर्कच्या बळावर सर्वसामान्यांना उत्कृष्ट बँकिंग सेवा पुरवून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावण्याचा निर्धार यावेळी शाखेच्या संपूर्ण स्टाफकडून व्यक्त करण्यात आला आहे. फॅबटेक मल्टीस्टेटच्या इतर शाखांप्रमाणेच करमाळ्यातील शाखेकडून ग्राहकांना तप्तर सेवेसह गुंतवणूक आणि अर्थसहाय्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन केले जाते. ठेवींवरील आकर्षक व्याज तसेच गरजू व्यावसायिकांना वित्त पुरवठ्यासाठी नवनवीन योजना शाखेतर्फे राबविण्यात येतात. फॅबटेक मल्टीस्टेट विषयी अधिक माहितीसाठी नागरिकांनी करमाळा बसस्थानकासमोरील शाखेत किंवा मो.नं.७०२०९३६२४४ / ९४२३५३७४०२/ ८८८८१४८३०१ यावर संपर्क साधावा. -ब्रम्हदेव शिंदे, शाखाधिकारी, फॅबटेक मल्टीस्टेट, करमाळा.
.
.
.