विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सोबत बक्षीस म्हणून रोख रक्कम
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यात ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून इन्स्टिट्यूट तर्फे इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतच्या प्रवेशासाठी उद्या स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश निकत यांनी दिली आहे.

या परीक्षेसाठी इयत्ता चौथी ते सहावी (गट अ), सातवी ते नववी (गट ब) आणि दहावीमधून अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी (गट क) अशा तीन गटांतून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी आणि हिंदी विषयांचे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सोबत बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजी माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती प्रा.डॉ. निकत यांनी दिली आहे.

उद्या सकाळी १० वाजता ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या गणेश नगर येथील नवीन इमारतीत ही परीक्षा होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 9860878234 किंवा 9371710205 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट तर्फे करण्यात आले आहे.

.

.

.

.

