करमाळा : श्री कमला देवी चरणी शुक्रवार दि. २९ मे रोजी मृणाल गिरिष ताटी, रा. अहिल्यानगर यांच्या वतीने अंदाजे ११ हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर पुजारी रामदास सोरटे व वैभव सोरटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मंदिर पुजारी वैभव रामदास सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर जतन व संवर्धन कामासाठी ५०० रुपयांची रोख देणगी देण्यात आली. यावेळी मानकरी, सेवेकरी व भक्तगण उपस्थित होते. श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराचे पुरातन दगडी स्वरूप जतन करण्याचे काम सुरू असून हे काम भक्तांच्या देणगीतून प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
.
.
.
.