April 11, 2026
IMG-20260403-WA0008

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या एकाच गावात विनयभंगाच्या दोन घटना घडल्या आहेत. याबाबत करमाळा पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

यातील पहील्या घटनेतील २७ वर्षीय पिडीतेने दि.०१/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२९/०३/२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील अजय संपत शिंदे याने तिच्या घरात घुसून अश्लील वाक्ये बोलून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला आहे.

तर यातील दुसऱ्या घटनेतील ४५ वर्षीय पिडीतेने दि.०२/०४/२६ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.२९/०३/२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील दादाराम ब्रम्हदेव शिंदे याने तिच्या घरात येऊन तिचा हात पकडला व तू मला खूप आवडते असे म्हणून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला आहे.

या दोन्ही फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अजय संपत शिंदे आणि दादाराम ब्रम्हदेव शिंदे या दोघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४, ७५ आणि ३३३ नुसार गुन्हा दाखल केला असून पो.हे.कॉ. आरकीले हे पहील्या घटनेचा पुढील तपास करत आहेत तर दुसऱ्या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. पवार हे करत आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *