September 3, 2026
IMG-20260831-WA0034

करमाळा, प्रतिनिधी – विज्ञान प्रदर्शनामध्ये उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण प्रयोग सादर शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्सच्या ३६ विद्यार्थ्यांना पद्मश्री डॉक्टर अरविंद गुप्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रविवारी शहरातील पुणे रोड येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला.

दरवर्षीप्रमाणे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील यांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी केलेले विविध प्रयोग पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले कल्पक आणि शास्त्रीय प्रयोग पाहिल्यानंतर करे पाटील यांनी ३६ विद्यार्थ्यांची पद्मश्री डॉक्टर अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिकासाठी निवड केली होती.

रविवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे सदस्य संपतराव शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रचिती पुंडे, उद्योजक हिम्मतराव शिंदे, वीर माता सौ. अनुजा अरविंद निलंगे आणि नवभारत इंग्लिश स्कूलच्या सुनीता देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

यावेळी नवभारत इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट चमक दाखविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यासोबतच नवभारत इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ. मेघाली आडकर-शेटे यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या या यशाबद्दल गिरीधर दास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी यांच्यासह सर्व सदस्य आणि शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद ही उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!