July 28, 2026
IMG-20260630-WA0007

करमाळा, प्रतिनिधी – जुन्या नाण्यांच्या बदल्यात रु.६५ लाखांचे आमिष दाखवून दिल्लीच्या ठकाने करमाळा तालुक्यातील कामोणे येथील सर्वसामान्य सलून चालकाला १,००,७३६ रुपयांचा गंडा घातला आहे. दि.२०/०६/२६ ते दि.२३/०६/२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याबाबत कामोणे येथील गौतम अजिनाथ रंदवे (वय-३२) यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दिल्ली येथील राज ग्यानी (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याची फेसबुक व्दारे ओळख झाली होती. त्याने गौतम रंदवे यांच्याकडील जुन्या नाण्यांच्या बदल्यात त्यांना रु.६५,००,००० (अक्षरी रु. पासष्ट लाख) देतो असे सांगुन रंदवे यांच्याकडुन रजिस्ट्रेशन फी म्हणून दि.२०/०६/२६ ते दि.२३/०६/२६ दरम्यान वेळोवेळी फोन पे व्दारे एकुण १,००,७३६ रुपये वेगवेगळ्या फोन पे स्कॅनरवर ऑनलाईन पद्धतीने घेतले. मात्र राज ग्यानी याने फिर्यादी रंदवे यांना ठरल्याप्रमाणे कोणतीही रक्कम न देता फिर्यादीलाच आणखी रकमेची मागणी करुन फसवणुक केली आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी दिल्ली येथील राज ग्यानी (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यावर आणि रंदवे यांनी रक्कम पाठवलेल्या स्कॅनरच्या धारकावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ड) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!