July 28, 2026
IMG-20260630-WA0039

करमाळा, प्रतिनिधी – सध्या होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन करमाळा नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती यांनी शहरातील कानाड गल्ली येथे स्वखर्चातून बोअर घेतला आहे. मंगळवार दि.३० जून रोजी दुपारी चांदगुडे गल्ली येथील मध्यवर्ती ठिकाणी भाजपा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते बोअर मशीनचे पूजन करून हा बोअर घेण्यात आला.

शहराचा वाढता विस्तार आणि जुनी झालेली पाईपलाईन, दहिगाव पंपिंग स्टेशनला होणारा अपुरा वीजपुरवठा, अपघात किंवा इतर कारणांनी होणारी पाणी गळती यामुळे अनेक वेळा करमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बाधा येतात. याशिवाय उन्हाळ्यात तर सगळीकडेच गंभीर पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नगरसेविका गायकवाड यांनी स्वखर्चातून घेतलेल्या बोअरचा चांदगुडे गल्लीतील नागरिकांना मोठा आधार ठरणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष अतुल फंड, महिला व बालकल्याण सभापती निर्मला गायकवाड, नगरसेवक महादेव फंड, नगरसेवक सुनील बनसोडे, चांदगुडे गल्लीतील जेष्ठ नागरिक नारायण पवार, डी ग्रुपचे विजय लावंड, जोतीराम लावंड, ॲड. अमर शिंगाडे, कै.बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड, संजय चौधरी आदी जण उपस्थित होते. बोअर घेतला जात असल्याने पाण्याचा प्रश्न सुटल्याने यावेळी उपस्थित असलेल्या महिला वर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!