दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या उपक्रमात शेकडो भाविकांचा सहभाग
करमाळा, प्रतिनिधी – पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज मंदिरात श्री आदीनाथांना सहस्रजलधारा अभिषेक व पर्जन्य रुद्रयाग संपन्न झाला. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने या धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक २४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला भाविकांच्या हस्ते श्री आदिनाथ महाराजांना सहस्त्र जलधारा अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिराच्या प्रांगणात पर्जन्य रुद्रयाग करून वरूण राजाला पाऊस पाडण्यासाठी आवाहन करण्यात आले. याग संपन्न झाल्यानंतर गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित भाविकांशी मोबाईल कॉल वरून हितगुज केले.

यानंतर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सौ. रेश्मा कदम यांनी उपस्थित भाविकांना श्री स्वामी सेवेच्या १८ विभागांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. करमाळा शहरासह ग्रामीण भागात असलेल्या शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर तसेच परबतसिंग चौहान यांनी सहकार्य केले.

.

.

.

.

.

.

.

