July 27, 2026
IMG-20260726-WA0041

करमाळा प्रतिनिधी – करमाळा नगरपरिषदेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी करमाळा नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता आकाश वाघमारे यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आकाश वाघमारे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांबरोबरच विकासाभिमुख दृष्टीकोन आणि समाजकार्यातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वराज्याची प्रेरणा आणि समाजजागृतीसाठी केलेल्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

गणेश फलके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास बापू खारगे, अभय देशपांडे, प्रदीप चौकटे, आजमुद्दीन शेख, ओंकार झाडबुके, सुरज लष्कर, अमित शहा, विक्रम कांबळे तसेच ज्ञानेश्वर वाचन मंदिर अभ्यासिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!