July 27, 2026
IMG-20260727-WA0036

करमाळा , प्रतिनिधी – तालुक्यातील हिवरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथी मधील एकूण सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या वतीने गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

हिवरवाडी जि.प. शाळेतील उत्कर्ष धनाजी पवार, समीक्षा दत्तात्रय मेरगळ, श्रुती गोरख पवार, समर्थ महेश इरकर, जानवी राजेंद्र इरकर, प्रज्वल बापू इरकर, वैष्णवी निलेश इरकर या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. यासोबतच नन्हे सितारे स्पेलिंग बी या स्पर्धेत स्वराली राजेंद्र इरकर या विद्यार्थिनीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यशामध्ये विद्यार्थी, पालकांसह वर्गशिक्षक नाना वारे आणि वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक जीवनामध्ये आणखी प्रेरणा मिळावी, यासाठी सोमवार दि.२७ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

गतवर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते. शिक्षणाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवलेल्या या विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक नाना वारे आणि वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!