५१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
करमाळा, प्रतिनिधी – गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील पुनवर येथील राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत पुनवर येथील दत्त मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी एकूण ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. या शिबिरासाठी करमाळा येथील श्री कमलाभवानी ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणातून समाजासाठी उपयुक्त कार्य घडावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.

.

.

.

