May 6, 2026
IMG-20260318-WA0031

करमाळा, प्रतिनिधी – दिल्ली येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी द कॅसल ऑफ आर्ट थिएटर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि प्रतिष्ठित समारंभात करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथील सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रतज्ञ, अंकशास्त्र विशारद व ज्योतिष मार्गदर्शक श्री. महेशकुमार सुमंत कुलकर्णी यांना Magic Book of Record & Art University, Delhi यांच्या वतीने मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील अनेकांना वास्तुशास्त्र, ज्योतिष, अंकशास्त्र तसेच आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून योग्य दिशा देण्याचे कार्य कुलकर्णी यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने केले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत विद्यापीठाकडून त्यांना हा मानाचा बहुमान देण्यात आला आहे. या कार्यक्रमास देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. Magic Book of Record चे चेअरमन व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त व्यक्तिमत्व डॉ. सी. पी. यादव यांच्या हस्ते कुलकर्णी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व अनेक राज्यांचे ॲटर्नी जनरल म्हणून कार्य केलेले डॉ. राम अवतार शर्मा यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

यावेळी आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर मिस पूजा वत्स, गुजरात येथील मिस नॅन्सी मिश्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. कुलकर्णी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा सन्मान माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व यजमान, हितचिंतक मित्रपरिवार, नातेवाईक तसेच माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ यांना समर्पित करत आहे. त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच मला हे कार्य करता आले.
-डॉ.महेशकुमार सुमंत कुलकर्णी.

दिल्ली येथे प्राप्त झालेल्या या मानद डॉक्टरेट सन्मानामुळे मांजरगाव व करमाळा तालुक्याचा या वेगळ्या क्षेत्रामध्ये गौरव वाढला असून सर्व स्तरातून डॉ.महेशकुमार सुमंत कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!