करमाळा, प्रतिनिधी – शहरातील भीम नगर व सिद्धार्थ नगर येथील व्यायामशाळांसाठी आधुनिक साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी दिली.

या भागातील युवकांकडून अनेक वर्षांपासून आधुनिक व्यायाम साहित्याची मागणी होत होती. या मागणीचा पाठपुरावा करत कांबळे यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर यांच्या मार्फत निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच साहित्य उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे स्थानिक युवकांना मोफत किंवा कमी खर्चात व्यायामाची सुविधा उपलब्ध होणार असून, आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळणार आहे, असे कांबळे यांनी सांगितले. तसेच या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.

.

.

.

.

.

