शाळा व्यवस्थापन समितीकडून गुणवंत विद्यार्थ्यांसह वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड यांचा सत्कार
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील हिवरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोघांची मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हिवरवाडी जि.प. शाळेत इयत्ता पाचवी मधील किंजल मिलिंद कांबळे व श्रेयस प्रकाश लांडगे या दोघांची जवाहर नवोदय विद्यालयात नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल बुधवार दि.१८ रोजी या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड यांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. यासोबतच माजी विद्यार्थी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल पवार यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक रंगनाथ देशमाने, शिक्षक नाना वारे, नितीन व्हटकर, सौ. निर्मला पाटोळे, अंगणवाडी शिक्षिका संगीता पवार, उषा इरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, ग्रा. पं. सदस्य गणेश ईवरे, महेश इरकर, प्रकाश लांडगे आदी जण उपस्थित होते.


.

.

.

.

.

