April 13, 2026
IMG-20260323-WA0051

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्सला पहिला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन आणि पुणे येथील यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मंगळवार दि. १७ मार्च रोजी अक्कलकोट येथील कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निकल कॉलेज येथे श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टचे चेअरमन महेश इंगळे आणि प्रा. डॉ. गणेश करे पाटील यांच्या हस्ते मानपत्र, ट्रॉफी आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश देत हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. विनाअनुदानित तत्त्वावर असूनही या शाळेने करमाळा तालुक्यामध्ये आपल्या शाळेचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य जपण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच प्रयत्नांची पोच पावती म्हणून हा पुरस्कार मिळाला असल्याचे शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनीता देवी यांनी म्हटले आहे.

या पुरस्काराबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, संचालिका सौ. सुनिता देवी व मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांचे आभार मानले.

हा पुरस्कार घेण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. यावेळी करमाळा तालुक्यातील पहिला अरविंद गुप्ता पुरस्कारही शाळेच्या संचालिका सौ. सुनीता देवी यांना देण्यात आला. या दुहेरी यशामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *