April 13, 2026
IMG-20260324-WA0005

करमाळा (फारूक शेख, परांडा) – माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देणे आणि वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणे परंडा तालुक्यातील आलेश्र्वर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाला चांगलेच भोवले आहे. राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाने याप्रकरणी कडक पाऊल उचलत संबंधित ग्रामसेवकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील आलेश्वर येथील फारूक बादशहा मुलाणी यांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी आलेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाकडे ठराविक कालावधीत केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या व खर्च करण्यात आलेल्या निधीचा तपशील माहिती अधिकार कायद्यान्वये मागितला होता. मात्र जन माहिती अधिकारी तथा तत्कालीन ग्रामसेवक महादेव गिरी यांनी विहित मुदतीत माहिती न दिल्याने फारुक मुलानी यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी विस्तार अधिकारी, पंचायत समिती परंडा यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते.

या अपिलावर २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होऊन विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला सात दिवसांच्या आत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ग्रामसेवकाने या आदेशाला केराची टोपली दाखवत माहिती दिली नाही. खंडपीठाची कारवाई वरिष्ठ स्तरावरून आदेश देऊनही माहिती मिळत नसल्याने फारूक मुलानी यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाकडे धाव घेतली. या प्रकरणावर २९ जानेवारी २०२३ रोजी सुनावणी झाली. त्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने मुलानी यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला. अखेर १४ मे २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कठोर भूमिका घेतली.

माहिती अधिकार कायद्याचा अवमान केल्याबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवकाला १० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश खंडपीठाने पारित केले. या आदेशाची प्रत ११ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (धाराशिव), गटविकास अधिकारी (परंडा) आणि अर्जदार यांना दि .11/12/2025 रोजि प्राप्त झाली आहे.

त्या आदेशानुसार गट विकास अधिकारी परंडा पंचायत समिती यांनी दिनांक १६ /३/२०२६ नुसार आस्थापना विभाग (२) दहा हजार रुपये वसूल करून घ्यावे व चलनाचे पावती या कार्यात सादर करावी असे पत्र काढले आहे. या कारवाईमुळे माहिती अधिकारात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अर्जदाराने दिलेल्या कायदेशीर लढ्याचे सर्वत्र कौतुक व माहिति अधिकार कार्यकर्ते संघटने तर्फे सत्कार करण्यात आले यावेळी फारूक शेख, कानिफनाथ सरपने , विजय मेहेर, जमीर शिकलकर, भाऊ करळे, धनजय गोफणे, मगर, आसलम पल्ला, किशोर येवारे ईत्यादि उपस्थित होते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *