केत्तूर, रवि चव्हाण – करमाळा तालुक्यातील केत्तूर नं २ येथील रहिवाशी शांताबाई रोहिदास देवकते (वय-८२ वर्षे) यांचे आज सोमवार दि.३० मार्च रोजी सकाळी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सायं. ७ वा. केतूर नं. २ येथील भीमा नदीकाठच्या वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी सैनिक (मेजर) नवनाथ देवकते व ठाणे शहर पोलीस देविदास (काका) देवकते यांच्या मातोश्री तर ग्रामविकास अधिकारी विशाल देवकते यांच्या त्या आजी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
