May 6, 2026
IMG-20260417-WA0006(1)

उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

करमाळा, प्रतिनिधी – आज शुक्रवार… शहराच्या आठवडी बाजाराचा दिवस… वेळ सकाळी दहाची… स्थळ करमाळा शहरातील पेट्रोल पंप परिसर… तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले शेतकरी आणि व्यापारी आपापला भाजीपाला, फळे, मसाल्याचे पदार्थ, मासळी आदींची मांडणी करून ग्राहकांची वाट पाहत आहेत आणि शहरातील नागरीकांची बाजारासाठी गर्दी होत आहे आणि अशातच शहरातील एका व्यापाऱ्यासोबत बाजारासाठी आलेल्या तरुणावर पाठीमागून चाकू हल्ला होतो…

हो, असं घडलंय…, करमाळा शहरातील सुवर्णकार असलेल्या व्यापाऱ्यासोबत मदतीला म्हणून आलेल्या ऋषिकेश रवींद्र अडसूळ (वय -३२ रा. भोसे, ता. करमाळा) या कामगारावर करमाळा शहरातील भर आठवडी बाजारात चाकू हल्ला झालेला आहे. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे सतर्क होऊन जोरात ओरडल्यामुळे आणि चाकू खांद्यात रुतून बसल्यामुळे हल्लेखोर पसार झाला.

हा हल्ला झाल्यानंतर ऋषीकेशला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याच्या खांद्यात बसलेला चाकू काढून पुढील उपचार केले आहेत. या हल्ल्याची घटना कळताच करमाळा पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून घटनास्थळीही चौकशी करून हल्लेखोराचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. ऋषिकेशची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर कशामुळे हल्ला झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!