June 12, 2026
ऑनलाईन फसवणूक

एपीके फाईल न उघडता डिलीट करण्याचे आवाहन

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या खात्यावरील हजारो रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली आहे. मोबाईलवर आलेल्या APK file डाउनलोड केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील आळजापूर येथील गोरख बाळनाथ रोडे (वय-३९ वर्षे) यांनी दि.२८/०५/२६ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२३/०५/२६ रोजी सायंकाळी ५.०८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल मध्ये अज्ञाताने कोणती तरी apk files पाठवुन त्यांचा मोबाईल हॅक केला व त्यांच्या बँक खात्यातील ९२,२२२/- रु त्याचे खात्यावर ट्रान्सफर करुन फसवणुक केली.

रोडे यांच्या फिर्यादीवरून कामावर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

दरम्यान व्हाट्सअप, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांवर येणाऱ्या APK एक्स्टेंशन असणाऱ्या फाइल्स ओपन किंवा डाऊनलोड न करता त्वरित डिलीट करण्याचे आवाहन करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.

.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!