June 11, 2026
IMG-20260529-WA0045

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील कै.नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेतील इयत्ता दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यीनींचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम विकास परिषदेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कै.नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेतून इयत्ता दहावीच्या परीक्षेत कु. इकरा मजहर शेख हीने प्रथम, कु. शाहीस्ता सत्तार शेख हीने द्वितीय तर कु. जारा मुनाफ कुरेशी हीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतीजा वेदपाठक यांच्या हस्ते या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. वेदपाठक यांनी या विद्यार्थीनींसह त्यांना शिक्षणासाठी प्रेरीत करणाऱ्या पालकांचेही कौतुक केले. या मुलींसह इतर विद्यार्थीनींही पुढील उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनिअर, अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर, इंग्रजीचे शिक्षक इब्राहिम मुजावर तसेच हाज यात्रेसाठी मुन्ना सय्यद यांचा ही सन्मान मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार, जहांगीर बेग, न्यु इरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अजीम मोगल यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, बकशभई शेख, जमीर शेख, आझाद शेख, जिशान कबीर, सुहास आगलावे, जुबेर सय्यद, पत्रकार अशपाक सय्यद यांच्यासह शाळेचा शिक्षक वृंद आणि पालक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज बेग, असीम बेग, समीर शेख, शाहरुख शेख, शाहीद बेग, जावेद शेख, आलीम खान, जुबेर सय्यद आदींनी परिश्रम घेतले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!