June 11, 2026
IMG-20260530-WA0026(1)

दोन दिवसांची पोलीस कोठडी

करमाळा, प्रतिनिधी – डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस बंदी असलेली तब्बल १५० इंजेक्शन्स बाळगल्याप्रकरणी करमाळा पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले आहे. शहरातील कर्जत रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी माहिती देताना सांगितले आहे की, दि.२७/०५/२६ रोजी १२.५० वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील कर्जत रोड वरील कॅनॉल लगतच्या पाण्याच्या टाकीच्या शेजारुन मोटरसायकलवरून जात होते. या दोघांचा संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडील पिशवीची पाहणी केली असता त्या पिशवीत ट्रोईका कंपनीचे रु. ३३,४४० किंमतीचे १०० तर टर्मिवा कंपनीचे रु. १५,६९३ किंमतीचे ५० असे एकूण १५० मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन्स मिळून आले. या कारवाईत आरोपीं कडील रु.१,६०,००० किंमतीच्या मोटार सायकलसह एकूण रु. २,०९,११३.५ किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले होते.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, पो.कॉ. मिलिंद दहीहांडे, पो.कॉ. अर्जुन गोसावी, पो.कॉ. अमोल रंदील, पो.कॉ. स्वप्निल शेरखाने यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

शनिवारी या दोन्ही आरोपींना करमाळा न्यायालयात उभे केले असता न्यायाधीश श्रीमती एस.पी. कुलकर्णी यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. सचिन लुणावत तर आरोपींतर्फे ॲड. प्रमोद जाधव यांनी काम पाहिले.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!