June 10, 2026
IMG-20260603-WA0071

हिंगणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – वादळी पावसामुळे महावितरणचे विजेचे खांब पडल्यानंतर वीजपुरवठा बंद असल्याच्या कारणावरून महावितरणच्या वीज उपकेंद्राच्या सहा. अभियंता आणि यंत्रचालकाला दोघांनी मारहाण केली आहे. करमाळा तालुक्यातील हिंगणी वीज उपकेंद्रावर हा प्रकार घडला आहे.

याबाबत महावितरणच्या केत्तुर शाखेचे सहा. अभियंता मंदार दिलीप राजमाने यांनी दि.०१/०६/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.०१/०६/२६ रोजी ते हिंगणी वीज उपकेंद्रात दैनंदिन सरकारी कामकाज करत होते. यावेळी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हिंगणी येथील सचिन फुलचंद जाधव आणि प्रकाश धनराज जाधव हे तेथे आले आणि ‘आम्ही बिगर लाईटचे घरी थांबणार आणि तुम्ही येथे फॅनखाली बसून हवा खाणार का?’ असे म्हणत फिर्यादी राजमाने यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. दरम्यान राजमाने हे कार्यालयाबाहेर गेले असताना या दोघांनी उपकेंद्रावरील यंत्र चालक संताजी बाबर (रा. हिंगणी) यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला.

सहा. अभियंता राजमाने यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी सचिन फुलचंद जाधव आणि प्रकाश धनराज जाधव यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पो. हवा. सुहास पवार हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!