June 11, 2026
IMG-20260603-WA0066(1)

पुसद तालुक्यातील दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – ऊस तोडणीकरता मजुर पुरवतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील दोघांनी मांगी येथील शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक केली आहे. मजूर न पुरवल्याने तसेच घेतलेली रक्कम ही परत न केल्याने संबंधिताने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील मांगी येथील वैभव लालासाहेब बागल यांनी दि.०२/०६/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नामदेव मोहन कासार आणि विनोद आप्पाजी पवार (दोघे रा. बेलोरो ता. पुसद जि. यवतमाळ) या दोघांनी फिर्यादी वैभव यांना ऊस तोडीसाठी मजूर पुरवतो म्हणून दि. ०५/११/२४ ते दि.०७/१२/२४ दरम्यान फिर्यादीच्या मांगी येथील शेतात रक्कम रु. 6,49,672/-रु. (अक्षरी रू. सहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे बहात्तर) घेतली होती. मात्र त्यांनी ठरल्याप्रमाणे मजूर पुरवले नाहीत तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही.

बागल यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी वरील दोघ आरोपीं विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पो.ना. अशपाक शेख हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!