June 10, 2026
IMG-20260118-WA0018(1)

करमाळा, प्रतिनिधी – शेजारच्या गावातील महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच मारहाण, जीवे मारण्याची धमकी देऊन सत्तुरने जखमी केल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील एका व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिलेने (नाव गोपनीय) ४ जून २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शशिकांत आत्माराम केकान (रा. शेलगाव वांगी, ता. करमाळा) याने ऑगस्ट २०२४ ते ३ जून २०२६ या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरी वारंवार लैंगिक संबंधांची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतरही तिला व तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक संबंध ठेवले.

तसेच ३ जून २०२६ रोजी फिर्यादी कामानिमित्त इंदापूर येथे आरोपीस न सांगता गेल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादी व तिच्या मुलास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या घरातील लोखंडी सत्तूर घेऊन फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर वार करून तिला जखमी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2)(म), 118(1), 333, 351(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर हे करीत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!