करमाळा, प्रतिनिधी – शहरातील राशीन पेठ येथे रविवार दि.७ जून ते शनिवार दि.१३ जून २०२६ या कालावधीत भव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यात प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री संदीप बुवा मांडके (पुणे) हे कथा व्यास म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दररोज दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत हॉटेल रामभरोसे समोरील उमेश आगरवाल यांच्या हॉलमध्ये या भागवत कथामृताचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. कथा सप्ताहाचे आयोजन राशीन पेठ येथील सोहम महिला मंडळाने केले असून या कार्यक्रमास राशीन पेठ तरुण सेवा मंडळाचे सहकार्य लाभले आहे.
या धार्मिक कार्यक्रमात श्रीमद् भागवत महापुराणातील विविध प्रसंग, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचा उलगडा संगीतमय पद्धतीने करण्यात येणार आहे. तेज वार्ता या यु ट्युब चॅनलवरुन या कार्यक्रमाचे दररोज थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

या सप्ताहास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोहम महिला मंडळ आणि राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

.

.

