March 1, 2026
IMG-20251108-WA0025

उमेदवार प्रतिनिधी ऐवजी खुद्द उमेदवाराने उपस्थित राहण्याचे आवाहन

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या रविवार दि.९ रोजी दुपारी १ वाजता विद्यानगर येथील भाजपा संपर्क कार्यालयात संपन्न होतील, अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला सक्षम भारत सुदृढ स्वच्छ भारत देश घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीनिशी लढवणार आहे. करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या म्हणजे रविवारी दुपारी १ वाजता करमाळा विद्यानगर येथे संपन्न होतील. या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे उपस्थित राहणार आहेत. इच्छुक महिला उमेदवारांनी अन्य प्रतिनिधी पाठवू नये असे आवाहनही बागल यांनी केले आहे. करमाळा शहर व तालुक्यातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने व जनतेच्या साथीने करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी निश्चितपणे घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास शेवटी रश्मी बागल यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *