July 28, 2026
IMG-20260626-WA0014

काम घेणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – विहीर बनवण्याचे काम झाल्यानंतर तिचे मोजमाप घेताना दरड कोसळून तालुक्यातील वांगी नं. १ येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील झरे येथे ही घटना घडली आहे.

याबाबत अक्षय नागनाथ रकटे (वय-२९ वर्षे, रा. तळेकर वस्ती, वांगी नं.१, ता. करमाळा) यांनी दि.२४/०६/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल जगताप, आकाश जगताप, विशाल वारे, आप्पासाहेब पोपट शिंदे (सर्व रा. जातेगाव ता. करमाळा) व विनोद शिंदे (रा. खडकी, ता. करमाळा) यांनी झरे येथील कोकीळ यांच्या शेतात विहीरीचे काम घेतले होते. दि.२३/०६/२६ रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास या कामाचे मोजमाप घेण्यासाठी राहुल जगताप, आकाश जगताप, विशाल वारे व विनोद शिंदे यांनी स्वतः विहीरीमध्ये न उतरता फिर्यादीचे वडील नागनाथ अर्जुन रकटे यांना कोकीळ यांच्या शेतातील विहीरीमध्ये उतरवून कामाचे मोजमाप घेण्यास सांगितले. यावेळी हे काम घेणारे राहुल जगताप, आकाश जगताप, विशाल वारे, आप्पासाहेब पोपट शिंदे व विनोद शिंदे यांनी विहीरीच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने विहीरीची दरड कोसळुन दगड व माती फिर्यादीच्या वडीलांवर कोसळल्याने ते मयत होण्यास कारणीभूत झाले आहेत.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी राहुल जगताप, आकाश जगताप, विशाल वारे, आप्पासाहेब पोपट शिंदे व विनोद शिंदे यांच्यावर भा.न्या.सं. कलम १०५, ३५१(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून स.पो.नि. राजेंद्र ढोरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!