July 28, 2026
नगरपालिका

करमाळा, प्रतिनिधी – संत निवृत्तीनाथ महाराज व इतर दिंडींच्या, पालखी आगमनाच्या अनुषंगाने वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता करमाळा नगरपालिकेत पूर्वनियोजन बैठक पार पडली.

या बैठकीत पाणीपुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, विद्युत विभागाने सर्व पथदिवे कार्यान्वित ठेवणे व शहराच्या चारही दिशांना स्वागत कमानी उभारणे याबाबत निर्देश देण्यात आले. बांधकाम विभागास दिंडी मार्गावरील राडारोडा तातडीने हटवून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
याशिवाय आरोग्य विभागास वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंदिर, शाळा, भाजी मंडई व समाजमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे, आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणे, गर्दीच्या ठिकाणी फिरती शौचालये उभारणे तसेच मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल हरिभाऊ फंड, मुख्याधिकारी सचिन धोंडीराम तपसे, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. विविध विभागांतील समन्वयातून पालखी सोहळा सुरळीत व सुविधायुक्त पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!