July 27, 2026
मिसिंग १

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील गुळसडी येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी करमाळा शहरातील महाविद्यालयात गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत असून, दि. ११ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे बसने महाविद्यालयात गेली होती. मात्र दुपारी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी नातेवाईक, मैत्रिणी तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. त्यानंतर महाविद्यालयात चौकशी केली असता, सकाळी आठच्या सुमारास डोके व पोट दुखत असल्याचे सांगून ती घरी जाण्यासाठी निघाल्याची माहिती शिक्षकांनी दिली.

त्यानंतरही विद्यार्थिनीचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स.पो.नि. गिरीजा म्हस्के करीत आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!