परबतसिंग चौहान यांचा सामाजिक उपक्रम
करमाळा, प्रतिनिधी – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातून श्री क्षेत्र संगोबा येथील श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी शहरातून लक्झरी बस सेवा सुरू राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते परबतसिंग उर्फ पप्पू भंवरशेठ चौहान यांच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगोबा येथील श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनाला करमाळा शहर व परिसरातून मोठ्या संख्येने भाविक जात असतात. मात्र या मार्गावर रा.प. बसेसची वारंवारता कमी असल्याने येथे जाण्यासाठी महिलांसह वृद्ध, अपंग भाविकांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते परबतसिंग उर्फ पप्पू भंवरशेठ चौहान यांनी उद्या शनिवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ९ ते सायं. ६ च्या दरम्यान शहरातील भवानी पेठ येथील छत्रपती चौक येथून ४० सीटर लक्झरी बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी संगोबा येथे जाण्याची इच्छा असणाऱ्या परंतु वाहनाची सोय नसणाऱ्या महिला तसेच अपंग व वृद्ध भाविकांनी या मोफत सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परबतसिंग उर्फ पप्पू चौहान यांनी केले आहे.

.

.

.

.

.

.

.

