September 5, 2026
IMG-20260812-WA0039

करमाळा : श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचालित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ट्विंकलिंग स्टार्स, करमाळा येथे ‘पावसाळी दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रीती शेटे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अपर्णा भोसले उपस्थित होत्या.

यावेळी शाळेचा परिसर इंद्रधनुषी रंगांनी सजविण्यात आला होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख, रेनकोट तसेच ढग, इंद्रधनुष्य, चहाचा कप, फळे व भाज्यांच्या आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांनी पावसावर आधारित गाणी, कविता व भाषणे सादर केली. ‘RAINBOW’ आणि ‘RAINY SEASON’ असे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादरीकरण केले. शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनीता देवी, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी देशमाने, शिक्षक, पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षक-विद्यार्थ्यांचे नृत्य ठरले आकर्षण

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेले सामूहिक नृत्य. हातात रंगीबेरंगी छत्र्या घेऊन पावसाच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे ठेका धरला. निळ्या रंगाच्या साड्यांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षिकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन गायत्री परदेशी यांनी केले. शाळेच्या वतीने उपस्थित पालक, शिक्षक, प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!