करमाळा, प्रतिनिधी : करमाळा बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत ७६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ७१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण दोन अनोळखी महिलांनी लांबविल्याची घटना १० ऑगस्ट रोजी घडली.

कांचन बेबी मुसळे (रा. तेली गल्ली, करमाळा; सध्या जामखेड) या धार्मिक कार्यक्रमासाठी करमाळ्यात आल्या होत्या. कार्यक्रमानंतर जामखेडला जाण्यासाठी त्या बसस्थानकावर आल्या असता दुपारी चारच्या सुमारास बसमध्ये चढताना मोठी गर्दी होती. यावेळी त्यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी नातेवाईकांसह परिसरात शोध घेतला; मात्र संशयित महिला आढळून आल्या नाहीत. याप्रकरणी कांचन मुसळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जोतीराम बाळसराफ करीत आहेत.

.

.

.

.

