अवैधरित्या लिपिक पदाच्या भरतीचा ठपका
करमाळा (विशाल परदेशी ) – तालुक्यातील वांगी नं. २ येथील श्री अवधूत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वनवे यांचे मुख्याध्यापक पदाचे अधिकार सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी काढून घेतले आहेत. वनवे यांच्यावर असलेल्या विविध आरोपांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

वनवे यांच्या कारभाराविषयी विविध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आहेत. विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर शुल्क मागणी, पालक व ग्रामस्थांना धमकावणे तसेच इतर अनियमिततेबाबत निष्पक्ष चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांकडून होत होती.

त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ४ नुसार अवधूत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे हे मुख्याध्यापक पदाची कर्तव्ये व जबाबदा-या सांभाळण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक १६.०८.२०२६ रोजी वनवे यांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दिलेले मुख्याध्यापक पदाचे स्वाक्षरीचे अधिकार काढून घेत असल्याबाबतचे पत्र शेलगाव येथील श्री दत्त बहुउद्देशीय संस्थेला दिले आहे.

.

.

.

