September 3, 2026
IMG-20260819-WA0027

जबरदस्तीने शेतरस्ता काढण्यात होता सहभाग

करमाळा, प्रतिनिधी – शेतातील पिकाचे नुकसान करून जबरदस्तीने रस्ता केलेल्या चौघांवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत मकाईचे संचालक सतीश निळ यांचा समावेश आहे.

याबाबत नागनाथ वाघमारे (रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापुर) यांनी दि.१८/०८/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.05/08/2026 रोजी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास आप्पा वासुदेव शिंदे, राजेंद्र महिपती रोकडे, संजय येताळा रोकडे, सतिश मधुकर निळ (सर्वजण रा. निमगाव हवेली, ता. करमाळा, जि. सोलापुर) यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून, दमदाटी व जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने त्यांच्या शेतातून रस्ता करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शेतातील ऊस पिकाचे ट्रॅक्टरच्या साहाय्याने नुकसान केले आहे.

वाघमारे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आप्पा वासूदेव शिंदे, राजेंद्र महिपती रोकडे, संजय येताळा रोकडे आणि सतिश मधुकर निळ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि.एस. या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

करमाळा तालुक्यात 14 वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या जमिनीतूनच रस्ता काढण्याच्या अट्टहासापोटी होणाऱ्या त्रासाबाबत फिर्यादी नागनाथ उत्तम वाघमारे हे दि.१५ ऑगस्ट पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे न्याय मिळाला असल्याची भावना नागनाथ वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!