करमाळा, प्रतिनिधी – समर्थ पॉवर सोल्युशन प्रा.लि. अंतर्गत करमाळा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या राणे एनर्जी सोलर सर्विसेसचा आज दि.७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

हा उद्घाटन सोहळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे हस्ते होणार असून, यावेळी आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या व सदस्या रश्मी बागल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे आमृळे पाईप्स शेजारी, गणेशनगर, करमाळा येथे होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यास नागरीकांनी उपस्थित रहावे; असे आवाहन ऋचा किरण राणे यांनी केले आहे.

.

.

.

.

