September 11, 2026
IMG-20260908-WA0031

ड्युटी अलोकेशनमधील फेरफार, बसच्या गैरवापरासह आर्थिक नुकसानीचे आरोप

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा एसटी आगारातील कथित आर्थिक गैरव्यवहार, सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर, ड्युटी अलोकेशनमधील फेरफार आणि प्रशासकीय कसुरीची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष योगेश नाना सुळे यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आगारातील टी.आय. जाधव व संबंधित अधिकाऱ्यांनी नियमबाह्य ड्युटी अलोकेशन करून जास्त ओटी दर असलेल्या चालक-वाहकांना ड्युटी दिल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच महामंडळाच्या बसचा विनाप्रवासी खासगी कामासाठी वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आगारातील सुटे भाग व गाड्यांची कमतरता, रिक्त पदांकडे दुर्लक्ष तसेच बस उशिरा सोडल्याने प्रवाशांची गैरसोय व महामंडळाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, पोलिसांत एफआयआर दाखल करावा आणि महामंडळाचे झालेले आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करावे, अशी मागणीही योगेश सुळे यांनी केली आहे.

सुळे यांनी वरिष्ठांकडे केलेल्या आरोपांबाबत करमाळा आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप त्यांच्यापर्यंत सदरचा अर्ज आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!