September 11, 2026
IMG-20260909-WA0018

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवात पार पडली.

दहीहंडी केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकता संघभावना बंधूभाव आणि जिद्दीचे प्रतीक आहे. एकमेकांवर दाखवलेला विश्वास आणि सहकार्य यातूनच मानवी मनोरा उभा राहतो.हा श्रीकृष्णाच्या बाललीला वर आधारित असलेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव आहे. ट्विंकलिंग स्टार्स मधील लहान लहान मुले श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत आली होती.

शाळेमध्ये प्रथम शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी मॅडम यांच्या शुभहस्ते श्रीकृष्णांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नंतर मुलांचे लक्ष वेधले ते दहीहंडीने .मुलांबरोबरच मुलींनी सुद्धा मानवी मनोरे रचण्याचा प्रयत्न केला . विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात उत्साहाने व हिरारीने भाग घेतला. दहीहंडी फोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला शिक्षकांतर्फे बक्षीस देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!