September 19, 2026
IMG-20260918-WA0038

करमाळा प्रतिनिधी – करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. करमाळा नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा सोमवार,दि.२१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता शहरातील भवानी नाका येथील छत्रपती चौकात अत्यंत उत्साहात होणार असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल हरिभाऊ फंड यांनी दिली आहे.

अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा करमाळ्यात उभारला जावा, अशी तीव्र इच्छा सर्व शिवप्रेमींची होती. अखेर हा ऐतिहासिक क्षण समीप आल्याने संपूर्ण करमाळा शहर व तालुक्यात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली सदरचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत यांनी दिलेली आहे.

या प्रसंगी करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन धोंडीराम तपसे व सर्व नगरसेवक तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

करमाळ्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक व गौरवशाली सोहळ्यास करमाळा शहर तसेच तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, नागरिक, महिला व अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवस्मारक प्रतिष्ठान, शिवजयंती उत्सव समिती व करमाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!