September 19, 2026
IMG-20260919-WA0075

करमाळा, प्रतिनिधी – बजाज फायनान्सच्या वतीने रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी मुंबईतील पंचतारांकित दि मेरिएट हॉटेलमध्ये मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य डीलर्सची दोन दिवसीय संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून सुमारे २०० व्यापाऱ्यांचा सहभाग असणार असून, करमाळा तालुक्यातून श्री बनशंकरी मोबाईल शॉपीचे ओनर बसवराज उर्फ बच्चूशेठ सोमनाथशेठ चिवटे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

बजाज फायनान्सचे संजीव बजाज यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीत व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी नवीनतम योजना, व्यवसायवृद्धी आणि भविष्यातील सेवा-सुविधांबाबत यावेळी विचारविनिमय होणार आहे.

शुक्रवारी बजाज फायनान्सचे करमाळा एरिया सेल्स मॅनेजर अक्षय जाधवर, एएसएससी पार्टनर अजित यादव व ब्रांच मॅनेजर विशाल चव्हाण यांच्या हस्ते बसवराज चिवटे यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. मोबाईल विक्री व्यवसायातील वृद्धी तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या निकषांवर चिवटे यांची या बैठकीसाठी निवड करण्यात आली आहे.

व्यावसायिक क्षेत्रात मानाची समजली जाणारी या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल करमाळा तालुका मोबाईल डीलर्स असोसिएशनच्या वतीने बसवराज चिवटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!