समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्याचा नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा निर्धार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील निमगाव (ह.) येथे बहुजन संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष विश्वनाथ परबत यांनी शेतकरी नेते मारुतीराव निळ यांची करमाळा तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर केली.

निवडीनंतर बोलताना मारुतीराव निळ म्हणाले, “बहुजन संघर्ष समितीने माझ्यावर सोपविलेली करमाळा तालुक्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनात्मक पातळीवर काम करणार आहे. वंचित, उपेक्षित व गरजू घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”

आपल्या कार्याची सुरुवात निमगाव (ह.) येथे समितीच्या शाखेचे उद्घाटन करून करणार असल्याचेही निळ यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या निवडीबद्दल रावसाहेब देवराव निळ-पाटील, नानासाहेब निळ (सर), संजय बापू कुंभार, निमगाव (ह.) ग्रामपंचायत सदस्य अरुण जगताप, गणेश जगताप, राम जगताप, बाबा करंडे, भगवंत ढेरे, शैलेश ढेरे, अशोक परबत, पांडुरंग बापू परबत, राजेंद्र सिंघण, सिद्धू जगदाळे, तडवळचे माजी सरपंच मोहन वाघमारे, कुर्डवाडीचे हरीष घोणे, सागर कांबळे, सुनील बागाव, श्रीराम निळ, मधुकर जगताप, प्रमोद गाडे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी संजयमामा शिंदे गटाचे नेते नानासाहेब निळ (सर), सिदनाना जगदाळे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे संघटक संजय कदम तसेच हिसरेचे माजी सरपंच बाळासाहेब पवार उपस्थित होते.

