October 28, 2026
IMG-20260926-WA0033

करमाळा, प्रतिनिधी – राशिन पेठ तरुण सेवा मंडळाचे ज्येष्ठ दिवंगत सदस्य शिवा (नाना) कांबळे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांसाठी अल्पोपहार व पाणी वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. राशिन पेठेतील युवक तसेच करमाळा शहरातील विविध गणेश मंडळांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाचा एक हजाराहून अधिक गणेशभक्तांनी लाभ घेतला.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भक्तांना अल्पोपहार व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उपक्रमाला चांगले स्वरूप प्राप्त झाले. या उपक्रमासाठी स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांचे चिरंजीव सुरज कांबळे, कांबळे परिवार तसेच राशिन पेठ तरुण सेवा मंडळाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कांबळे परिवाराकडून यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!