डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी कृती समिती स्थापनेबाबत करमाळ्यात बैठक
करमाळा, प्रतिनिधी – २५० किलोमीटर वरील कुकडी प्रकल्पाचा करमाळा तालुक्यात लाभ होण्याच्या दृष्टीने डिंभे ते माणिकडोह बोगद्याची निर्मिती गरजेचे असल्याचे श्रीगोंद्याचे माजी आमदार घनश्याम शेलार यांनी स्पष्ट केले. करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेची गरज पटवून देण्यासाठी शहरातील हॉटेल गणेश येथील फंक्शन हॉलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्यासह दिग्विजय बागल, सुजित बागल, पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, सदस्य भरत आवताडे, महावीर कांबळे, हनुमंत मांढरे, संदीप शेळके आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत दिग्विजय बागल यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मा.आ. शेलार यांनी करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्यासाठी डिंभे ते माणिकडोह ही दोन धरणे जोडणाऱ्या बोगदा होणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. यासाठी कुकडी प्रकल्प ते मांगी तलाव या मार्गावरील सर्व शेतकऱ्यांसह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याने डिंभे-माणिकडोह बोगदा निर्माण कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले.

या बैठकीला करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी कुकडी प्रकल्पाच्या लाभाविषयी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना असलेल्या शंकांचे निरसन शेलार यांनी केले.

.

.

.

