March 1, 2026
IMG-20251115-WA0050(1)

करमाळा,प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी ५४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे.

शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या अर्धांगिनी सौ. मोहिनी संजय सावंत आणि मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ. महानंदा जयवंतराव जगताप यांचे दोन अर्ज दाखल झाले असून शनिवार पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय नगरसेवक पदासाठी शनिवारी विविध प्रभागांतून तब्बल ५२ अर्ज दाखल झाले असून शनिवार पर्यंत नगरसेवक पदासाठी एकूण ५५ अर्ज दाखल झाले आहेत.

करमाळा नगरपालिकेसाठी तिरंगी लढत स्पष्ट दिसत असून अर्ज भरण्यासाठी उरलेल्या दोन दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवर करमाळा नगरपालिका निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *