March 1, 2026
IMG-20251118-WA0014

गटातटाच्या लढतीला पक्षीय झालर

करमाळा, प्रतिनिधी – नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी लढती जवळजवळ निश्चित झाल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारांचे १५ अर्ज तर नगरसेवक पदासाठी २६९ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची आज छाननी होणार आहे.

करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सांप्रतची निवडणूक लढण्यासाठी शहरातील जगताप, बागल, सावंत, घुमरे हे प्रस्थापित गट सरसावले आहेत. यांपैकी जगताप, बागल, घुमरे हे पक्षीय बॅनरखाली तर सावंत हे स्थानिक आघाडीच्या नावावर ही निवडणूक लढवत आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून सौ. महानंदा जगताप, भाजपाकडून सौ. सुनिता देवी, करमाळा शहर विकास आघाडीकडून सौ. मोहिनी सावंत यांची नावे जवळजवळ निश्चित असून, राष्ट्रीय समाज पक्षाकडून सौ.भावना गांधी तर अपक्ष म्हणून सौ. प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल आहे.

याशिवाय करमाळा नगरपालिकेच्या दहा प्रभागांतून २० नगरसेवकांसाठी त्या त्या प्रभागातील आरक्षणा नुसार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यासोबतच मा.आ. संजयमामा शिंदे समर्थक सात ते आठ उमेदवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नगरसेवक पदासाठी चे अर्ज भरलेले आहेत. नगराध्यक्ष पदासह बहुतेक प्रभागांमध्ये तिरंगी लढत स्पष्ट असून छाननी नंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर करमाळा नगरपालिका निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *