March 1, 2026
IMG-20251120-WA0050

करमाळ्याच्या तिघांवर गुन्हा दाखल…

करमाळा, प्रतिनिधी – थकीत बिलामुळे तोडलेले कनेक्शन जोडल्यानंतर डिपी चालू करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला अडवून मारहाण केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवार दि.२० रोजी शहरातील कर्जत रोड वरील नागोबा मंदिराजवळ हा प्रकार घडला आहे.

याबाबत महावितरणचे करमाळा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ जावेद इन्नुस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २०/११/२५ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास ते श्रीपती चव्हाण यांच्यासह शहरातील कर्जत रोडवरील शौकत मुलाणी यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्यासाठी गेले होते. कनेक्शन जोडल्यानंतर शेख आणि चव्हाण हे डी पी चालु करण्यासाठी जात असताना शौकत मुलाणी व त्यांची दोन मुले कय्युम व आसिम यांनी शेख यांना ‘कनेक्शन कट करण्याच्या अगोदर फोन का केला नाही’ असे म्हणुन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच कय्युम मुलाणी याने शेख यांना पकडले व आसिम व शौकत मुलाणी यांनी शेख यांना हाताने मारहाण करून आसिम याने शेख यांच्या डोक्यात व पाठीत वीट मारुन जखमी केले. तसेच शौकत मुलाणी याने शेख व चव्हाण यांना खोटी केस करण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा केला.

शेख यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी शौकत मुलाणी, असिम मुलाणी आणि कय्युम मुलाणी या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *