October 27, 2026
IMG-20261024-WA0044

करमाळा, प्रतिनिधी – दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाण्याअभावी शेतीत काम नसल्याने बांधकामावर कामाला जाणाऱ्या शेतकऱ्याचा कारच्या धडकेत करूण अंत झाला आहे. शुक्रवारी सकाळी सालसे-परंडा रोडवर ही घटना घडली आहे.

याबाबत सालसे येथील बसवेश्वर रघुनाथ सपकाळ यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 23/10/26 रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मुलगा मिनीनाथ बसवेश्वर सपकाळ (वय-45 वर्षे, रा. सालसे, ता. करमाळा) हा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जात होता. यावेळी तो सालसे शिवारातील रविराज राजाराम सपकाळ यांच्या शेताजवळ आला असताना पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कार क्र.एम एच 13 इ एस 2526 चा चालक महेश अमरनाथ भोसले (रा.गणेशनगर, करमाळा) याने त्याच्या ताब्यातील कारभार वेगात धोकादायक रित्या होय गईने व अविचाराने चालवून फिर्यादीचा मुलगा मिनीनाथ बसवेश्वर सपकाळ (रा. सालसे, ता.करमाळा) याला पाठीमागून धडक दिली.‌ या धडकेत मिनीनाथ याच्या सर्वांगास गंभीर मार लागून चालक महेश भोसले हा त्याच्या ताब्यातील कारच्या नुकसानीस आणि मिनीनाथच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.

बसवेश्वर सपकाळ यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी कारचालक महेश भोसले यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक चंद्रकांत गोरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मयत मिनीनाथ हा बसवेश्वर सपकाळ यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर कारचालक महेश भोसले हा बार्शी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. शांत आणि सुस्वभावी असलेल्या मिनीनाथच्या मृत्यूची माहिती मिळताच सालसे ग्रामस्थांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयासमोर गर्दी केली होती.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!