March 1, 2026
IMG-20251122-WA0002

प्रभाग क्रमांक पाच मधून प्रचारात आघाडी…!!!

करमाळा, प्रतिनिधी – लहान बंधू अमोल परदेशी यांच्या साथीने विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होत असताना करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागातून प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांतून आग्रह झाला. त्यामुळे करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभाग क्रमांक पाच (ब) चे करमाळा शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.

एक कारागीर म्हणून काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील येणाऱ्या संपर्कावेळी शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि दिवाबत्तीसह विविध अडचणी लोक बोलून दाखवत असतात. प्रस्थापितांकडे सामान्यांचा थेट संपर्क नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना अडचणी सांगण्यास मर्यादा येतात. प्रस्थापित किंवा प्रशासन आणि सामान्य जनतेत संपर्क करण्यासाठी सर्वसामान्यांना मध्यस्थाची गरज पडते. मात्र मध्यस्थाची भूमिका योग्य पद्धतीने हाताळूनही जनतेच्या पदरी अनेक वेळा निराशाच पडल्याचा कटू अनुभव अनेक वेळा आल्याचे विक्रमसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.

व्यवसायासह प्रभागातील सुतार गल्ली, कुरेशी मोहल्ला, फंड गल्ली, नागराज गल्ली, कानाड गल्ली, मंडई परिसरात होणाऱ्या गणेशोत्सवासह मोहरम पंजा सवारी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांच्यासह सर्व समाजाच्या महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमासह घरगुती कार्यक्रमांतही विक्रमसिंह परदेशी यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणून विक्रमसिंह परदेशी यांना नागरिकांची प्रथम पसंती असून करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने विक्रमसिंह परदेशी यांच्या उमेदवारीला न्याय मिळवून देण्याचा शब्द नागरिक देत आहेत.

त्यामुळे विक्रम सिंह परदेशी यांच्यासह समर्थकांनी प्रभागातून जोरदार प्रचार सुरू केला आहे. प्रभाग म्हणजे जहागिरी न समजता जबाबदारी समजून काम करण्याची धमक विक्रमसिंह परदेशी यांच्यात असल्यामुळे करमाळा नगरपालिकेवर प्रभाग क्रमांक पाच चा लोकप्रतिनिधी म्हणून विक्रमसिंह परदेशी यांचा विजय निश्चित असल्याचे शहरात गृहीत धरले जात आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *